rampandit.co.in
Open in
urlscan Pro
2606:4700:3037::6815:3b59
Public Scan
Submitted URL: http://rampandit.co.in/
Effective URL: https://rampandit.co.in/
Submission: On November 19 via api from FI — Scanned from FI
Effective URL: https://rampandit.co.in/
Submission: On November 19 via api from FI — Scanned from FI
Form analysis
1 forms found in the DOMGET https://rampandit.co.in/
<form role="search" aria-label="Search for:" method="get" class="search-form" action="https://rampandit.co.in/">
<label for="search-form-1">
<span class="screen-reader-text">Search for:</span>
<input type="search" id="search-form-1" class="search-field" placeholder="Search …" value="" name="s">
</label>
<input type="submit" class="search-submit" value="Search">
</form>
Text Content
Forbrukernet Skip to the content Search DR RAM PANDIT | PADMANANDAN PhD in Hindi-Urdu Literature (Comparative Studies) from the University of Mumbai Menu * Home * About * Blog * Contact Menu Search Search for: Close search Close Menu * Home * About * Blog * Contact * Home * About * Blog * Contact * Facebook * Email Categories Interviews (Taken) Magazines & Periodicals Marathi Published Articles कवी ‘ गुलजार ‘ यांची मुलाखत | GULZAR’S INTERVIEW IN MARATHI * Post author By सम्पादकीय प्रभाग (Editorial Team) * Post date April 28, 2022 * No Comments on कवी ‘ गुलजार ‘ यांची मुलाखत | Gulzar’s interview in Marathi Shri. Gulzar sahab interacting with students at Panjab University on 24.08.2016 (Photo by Keshav Singh/HT via Getty Images) > सोना, > काही श्वास तुझया पूर्वी जगलो > काही श्वास तुझयासवे जगत आहे > असं होत नाही का गं सोना, > की साऱ्या जीवनात > एक श्वास मिळतो जगण्यासाठी > अन् कधीकधी एका श्वासात > कोणी सारे जीवन जगतो > ह्या कवितांमधे मी > आपले श्वास एकत्र केले आहेत > > सोना, > जे तुझ्या झोळीत टाकीत आहे > काही श्वास जे मी जगून घेतले > काही श्वास जे मी जगू शकलो नाही > आणखी काही अर्धअपूर्ण श्वास, > ज्यात तू > आपले श्वास जोड़न देशील तर शप्पथ > एका श्वासात सारे जीवन जगून घेईन > > > – गुलजार > > ( मराठी अनुवाद : डॉ. राम पंडित ) होय ही कविता आहे; पण ही अर्पणपत्रिका आहे. ही आहे गुलजारची कविता. होय हा आहे कवितेतील सुगंधाला देहरूप देणारा गुलजार. चित्रपटातील संवाद, दिग्दर्शन ह्यापलीकडेही एक गुलजार उभा आहे. तो आहे कवी गुलजार. जीवनातील कडू-गोड अनुभव, प्रत्येक क्षणाच्या पडद्यात दडलेल्या जाणिवांचा शोध घेत अनंत श्रासांच्या प्रवासाला निघालेला हा यात्रिक स्वतःच्या कवितांबद्दल, उर्द साहित्याबद्दल काय म्हणतो, हे जाणून घेण्यासाठी मी ही त्याची घेतलेली मुलाखत. अनिवार मोह होत असतानाही मी त्याला त्याच्या वैयक्तिक व चित्रपट जीवनाबद्दल काहीही विचारले नाही; पण त्याबद्दल खंत नाही; पण तरीही वाटतं खूपच विचारायचं राहूनच गेलंय. हा संवाद गुलजारच्या साहित्यजीवनावर खूप प्रकाश पाडेल, यात शंका नाही. ‘राजस’चा वाचकवर्ग ह्या मुलाखतीचे सहृदयतेने स्वागत करेल अशी आशा नाही, तर मला पूर्ण खात्री आहे. काव्य-प्रवासाची सुरुवात राम : आपण कविता लिहिण्यास केव्हा व कुठे सुरुवात केली? गुलजार : हे फॅसिनेशन जे असतं, ते शाळेच्या वेळी लागलं. “विंटल कॉलस् ए पोएट”, असं म्हणतात. शायरीचा शौक त्या कच्या वयातच लागला. शहर दिल्ली.. शाळेचे दिवस अन् भाषा उर्दू.. कारण शिक्षणाचे माध्यम उर्दूच होते, त्यामुळे प्रारंभ तेथूनच झाला. .. माईक पाहिजे? .. राम : नको, मी नंतर प्रश्न लिहून घेईन. राम : तुम्ही कधी मुशायऱ्यात भाग घेतला आहे काय? कारण माझया तरी पाहण्यात आले नाही. गुलजार : दिल्लीत शाळा व कॉलेजमधे असताना मुशायऱ्यात भाग घेतला. नंतर मुंबईला आलो व येथेही कॉलेज जॉईन केले. इथेही पी. डब्लू. ए. – मीन्स प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन हीयर, यु नो. त्यावेळी बन्नेखाँ सज्जाद जहीर आदिबरोबर मुशायऱ्यात हजेरी लावीत असे; पण हे मुशायऱ्यात जाणे हळूहळू कुठंतरी सुटत गेलं.. अन् मग असं सुटलं की बस्स.. राम : पण मजरूह, साहिर आदि अजूनही भाग घेतात. गुलजार : होय, ते घेतात भाग.. पण, माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडीबहूत पुढे पुढे मला भीतीच बसली. आता माईकच्या समोर जाण्याचं धर्यही राहिलं नाही, असं म्हणाल तर हरकत नाही. गीतकार की कवी ? राम : मी तुम्हाला काय म्हणू? गीतकार की कवी? कारण आजचे समीक्षक तरी हे दोन भेद पद्य साहित्यात मानतात. त्यामुळेच मराठीत माडगुळकर आणि हिंदीत नीरजला कवी म्हणावयास ते तयार नाहीत. गुलजार : मी गीत लिहिण्यास फार उशिरा सुरुवात केली. तुम्ही तर माझे ‘जानम’ आणि ‘एक बंद चांद’ हे कवितासंग्रह वाचलेच आहेत. त्यात तुम्हाला दिसलंच असेल की मी मूलतः कविताच लिहितो. गीत लिहिण्याची मला संधी चित्रपटात आली, तरीही मी प्रथमतः ती स्वीकारली नाही; आणि आताही लिहितो तेही अगदी ठराविकच. करीअर म्हणून त्याचा स्वीकार केला नाही. भाषाशैली ते सोशल कमेंट्री राम : तुमच्या कवितेबाबत आमच्या उर्दूस्नेही व समीक्षक मित्रांचा आरोप आहे की ती ‘मीर’जीं एवढी नाही; पण अख्तर-उल-ईमान एवढी अस्पष्ट भाषा आहे. ह्याविषयी तुम्हांला काय सांगायचं आहे? गुलजार : होय, इमेजेसच्यामुळे, भाषेमुळे नाही; कारण इमेजेस थोड्या कठीण आहेत. त्या सर्वपरिचित नाहीत. माइया कविता वाचल्यानंतर जर तसे वाटत असेल तर ते मी कबूल करतो. जर तो गुन्हा आहे तर मला तो मान्य आहे, पण आता जेव्हा मी माझ्या जुन्या कविता वाचतो तेव्हा मला जाणवतं की पूर्वी मी जी भाषा वापरत होता ती फार क्लिष्ट होती व इमेजेस सोप्या होत्या. आता हळूहळू भाषा सोपी होऊ लागली व व्यस्त प्रमाणात इमेजेस मात्र कठीण होत चालल्या आहेत. हे परिवर्तन मी स्वत: अनुभवतो. राम : तुमची कविता आत्मकेंद्री आहे. त्यात सोशल क्लायमेक्स, जीवनाच्या वचनांचे वा ओढाताणींचे चित्र उमटत नाही. गुलजार : माझी कविता खाजगी आहे हे खरं आहे आणि मीही तिला उगाच ओढूनताणून राजकीय अथवा सामाजिक बनविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यातील विषय खाजगी – रिऍक्शन त्यात आहे. जसे मी ‘त्रिवेणी’ नावाचा फॉर्म कवितेत काही वर्षापूर्वी आणला. तीन ओळींचा हा काव्यप्रकार आहे. एके वेळी दोस्तांत बसलो होतो, ते म्हणाले, ‘यार, काय झालंय तुला’; पण हा फॉर्म हळूहळू प्रसिद्ध झाला.. > उफ ये भीगा हुआ अखबार > पेपरवाले को चेंज कर दो > पाँचसौ गाव सैलाब में बह गए इस साल > > – गुलजार आता, ‘पेपरवाला चेंज करो’ हे इंग्रजीचे शब्द आहेत; पण ते शब्द ओठांतून असे निघतात जणू हीच भाषा आहे. आता त्या वाक्याच्या मागे एक कॅरेक्टर नजरेस येते. बोलणारी एक एरिस्टोक्रेट व्यक्ती आहे. आय कैन इमेंजीन ए मॅन विथ गाउन आणि त्याने तोंडात पाईप धरला आहे. आता, सकाढी जेव्हा त्याच्या हाती भिजलेले वर्तमानपत्र पडते, तेव्हा नकळत त्याच्या तोंडून बाहेर पडतात ‘द मॅन हू इज नाट कन्सर्नड विथ फ्लड, बट कन्सर्नड विथ बेस्ट पेपर’. राम : आता इथे कुठेतरी सोशल कॉमेंटस आहेत. गुलजार : निश्चितच आहेत; पण त्या अशा उभारल्या आहेत की जाणवत नाही. मी मुद्दाम एखाद्या राजकीय पक्ष वा गरिबी आदि नजरेसमोर ठेवून त्या आणल्या नाहीत. त्या नकळत टिपल्या आहेत – माझया खाजगी जीवनातून. आता हे तर सहाजिकच आहे की माझ्या लिखाणातून माझी सोसायटी रिफ्लेक्ट होते. दॅट्स व्हाय दॅट पर्सन गेट्स इरीटेटेड (कॅरेक्टर), जेव्हा त्याला ओला पेपर नजरेस पडतो. मी काहीवेळा कॅरेक्टरची नावेही कवितेत वापरतो. जसं ‘खैरू’ नावाचं कॅरेक्टर. राम : होय, मी त्याबद्दल पुढे विचारणार आहेच. स्वसंपादन आता पुढला प्रश्न: असं कधी घडलं काय की, तुम्ही एखादी कविता लिहिली आणि नंतर स्वतःला पसंत न आल्यामुळे फाडली? गुलजार : फारच चांगला प्रश्न आहे. ज्यावेळी माझ॑ पहिलं पुस्तक प्रकाशित होणार होत॑, त्यावेळी माइया कविता ४००-५०० होत्या. मी स्वतःचाच समीक्षक झालो; आणि खूप क्रिटिकल होऊन ठरवले की यातून मला फक्त शंभर निवडावयाच्या आहेत, त्या निवडल्या.. नंतर काही दिवसांनी मागच्या उरलेल्या कविता पुन्हा बघावयास लागलो तर आणखी शंभर आढळल्या – ज्या, त्या क्षणी आवडल्या. कधी ह्या बऱ्या वाटतात तर कधी त्या.. त्यामुळे संख्या दोनशे झाली. मग शेवटी वैतागून शंभरच निवडल्या व उरलेल्या जाळून टाकल्या; आणि ठरवले, यापुढे जे काही लिहीन ते आजच्या माझ्या स्टॅंडर्डचे राहील. राम : पण ते कविता जाळण्याचं कृत्य सलत राहीलं असे नाही? गुलजार : होय यार, सलत तर किती तरी दिवस होतं; पण कुठेतरी हृदयावर दगड ठेवून अशी कठोर कृत्य करावी लागतातच. मग मात्र तसं कधी केल॑ नाही; बस्स एकदाच ती चिता जाळली; पास्टची. स्वानुभव वि. कलानुभव राम : तुमची कविता तुमच्या खाजगी जीवनाच्या जाणिवांचा पाढा वाचते. तुम्ही ‘हदयावर जी बेतते, ती नोंदीत राहते’ ह्या फैजच्या न्यायाने लिहिता, की ‘आर्ट फॉर द सेक ऑफ आर्ट’ ह्या ऑस्कर वाईल्डच्या तत्त्वानुसार लिहिता? गुलजार : भाई, सेक ऑफ आर्ट कधी लिहिले नाही. जाणवतं ते कुठे तरी सबकॉन्शसमध्ये एकत्रित होतं. बस, ते एक्सप्रेस करीत गेलो स्पॉन्टेनियसली मला कविता लिहायची आहे असं सांगत लिहिल॑ नाही. खरं एका कवीला ही जाणीव ठेवायला हवीच. मग एक वेळ येते की काहीच लिहिलं जात नाही. काही काळ फोटोग्रॉफी केली, काही काळ पेंटिंग केलं; मग पुन्हा ५०-६० कविता लिहायला लागलो; बस, असंच चालत राहते. एक जबाबदारी स्वतःवर टाकली की मला मुलांकरता लिहायचं आहे. खूप वर्षांपासून इच्छा होती. पुन्हा तेही स्वतःच्या जीवनातून उद्भवले. आपली मुलगी ‘बोस्की‘ हिच्या करिता एक पुस्तक दर वर्षी लिहितो व बोस्की नावाचेच एक कॅरेक्टर तयार केले. जेव्हा मी बाहेरगावी टूरवर किंवा आउट डोअरला जातो तेव्हा एक डायरी माझया समवेत असते. त्या डायरीत हळूहळू जमेल तसं लिहीत असतो. बोस्कीचं खरं नाव मेघना आहे. तिच्या पुस्तकातील कविता लहान मुलांसाठी असतात. त्यात लेअर्स पण आहे. जी प्राकृतदर्शनी लहानांसाठी वाटते; पण त्यामागे मोठयांच्यासाठीही काहीतरी आहे. शब्द आणि प्रतिमा राम : तुम्हांला असं वाटत नाही की तुमच्या, साहीरच्या किंवा शकीलच्या कवितेत उर्दूच्या त्या शब्दांचा उल्लेख जास्त होतो जे सर्वसाधारण वाचक जाणत नाहीत. फिराकच्या रुबाइयां, जॉनिसार अख्तरच्या ‘घर आंगन’ मधील रुबाइयां समजण्यास सोप्या आहेत. गुलजार : हे भाषेच्यामुळे नाही, इमेजमुळे आहे. मघा मी सांगितलंच की जेव्हा मी खूपसं क्रिटिकल होऊन माझ्या पंधरा वर्षापूर्वीच्या कवितांकडे पाहतो त्यावेषी लक्षात येतं की आज मी जी उर्दू भाषा लिहितो ती पूर्वींपेकशा सोपी आहे; पण त्यातील इमेज कठीण होत चालली आहे. ह्याच विरुद्ध पूर्वी होत॑. राम : हे तर अधिक कॉम्प्लिकेटेड झालं. इमेजच समजली नाही तर भाषा समजुन उपयोग काय? गुलजार : होय, ते मान्य आहे. आता माझी ‘मेरे अपने’ मधील कविता बघ, ‘चांद का कटोरा लिए भिकारन रात रोज अकेली आए – रोज अकेली जाए.’ ह्यात लोकं चांद जाणतात, कटोरा जाणतात, अन् भिकारनही जाणतात. त्यामुझे मी म्हणतो माझी आजची भाषा पूर्वीपेक्षा सोपी आहे. राम : तुमच्या कवितेवर तुमच्या स्टॅंडर्ड ऑफ लिव्हिंग व सोसायटीचा प्रभाव आहे; जसे तुम्ही लिहिलेली ही कविता – > पांच बजे है टी. व्ही. पर > आनेवाले हफ्ते की झांकी बोल रही है। > > गुलजार गुलजार : होय, माझ्या कवितेवर सोसायटीचा प्रभाव आहे. बरं झाल॑ तुम्ही वाचली ती. नकळत मी ज्या सोसायटीत राहतो ती त्यात रिफ्लेक्ट होणं सहाजिक आहे. हा सीन मी ड्रॉइंगरूममधे एकटा बसलो असतानाचा आहे. समोर टी. व्ही. चालू आहे; आणि माझ्या डोक्यात एक साथ दोन लेअर्स कशा चालतात ते ह्यात विषद केल॑ आहे. आवडती रचना राम : तुमची स्वतःची आवडती कविता कोणती, चित्रपटातली वा इतर. गुलजार : तसं पाहिल॑ तर मला चित्रपटात माझं असं आवडतं एकही गीत अथवा कविता नाही हं! काही गीते चित्रपटाच्या हिशोबाने चांगली आहेत; ‘किनारा’ मधे दोन गीतं चांगली आहेत; पण ह्यावेळी मला ‘मेरे अपने’ मधली ‘चांद कटोरा लिये भिकारन रात’ हीच कविता जास्त आवडते, आणि खालील कविता (जी चित्रपटात नाही) – > कधी वळणावरती बघितलंय > तो वृद्धसा वृक्षराज? > माझया परिचयाचा आहे, > खूप वर्षांपासून आम्ही ओळखतो. > जेव्हा मी लहान होतो, > तेव्हा एक आंबा तोडण्यासाठी > भिंतीवरून खांद्यावर चढलो होतो ह्याच्या > न जाणे कोणत्या दुखऱ्या फांदीला पाय लागला माझा > धाडकन् खाली कोसळलो, > ढकलले होते त्या झाडाने मला > मी पण खुनशित खूप दगड मारले त्याला.. > माइया लग्नाच्या वेळेस मला आठवतेय, > त्याने फांद्या देऊन > माझया वेदीच्या हवनाला गरम केले होते. > अन् जेव्हा ‘बिबाला’ डोहाळे लागले > तेव्हा रोज दुपारी माइया पलीकडे > कैऱ्या फेकल्या होत्या ह्यानेच > काळासमवेत सारे फूल, > सारी पाने गळाली > तरीही जळत होतो; > जेव्हा बाळाला सांगतसे ‘बिंबा’ > ‘होय त्याच झाडावरून जातो कधीतरी > खाकरून विचारतो, > “काय डोक्यावरचे सारे केस उडाले काय?” > सकाळपासून तोडीत आहेत त्याला कमेटीवाले > वळणापर्यंत जाण्याचे धैर्य होत नाही मला.. > > – गुलजार > > ( मराठी अनुवाद : डॉ. राम पंडित ) प्रभाव आणि प्रेरणा राम : तुमच्या कवितेची मूळ प्रेरणा कोणती? आणि तुमच्या कवितेवर कोणत्या कवीचा प्रभाव जास्त आहे? गुलजार : मला बंगाली प्रवृत्तीचा माणूस म्हणतात हे तुम्हांला माहीतच आहे. त्याचा प्रभाव माइया राहणीमानावर पडला; पण उस्ताद, शायर जर म्हणाल तर टागोरांचा प्रभाव आहे. त्यांना ओरीजनल वाचल्यामुळे सहाजिक बंगालीच शिकलो (विनोदाने) अन् बंगाली शिकलो तर एका बंगालन पोरीवर प्रेमही केल॑, लग्नही केलं. ह्यानंतर सुभाष मुखर्जी, जीवनानंददास गुप्त ह्यांच्यापासून फार प्रभावित झालो. अन फैज आणि अख्तर-उल-ईमान. तुम्ही अख्तर-उल-ईमानचे नाव घेताच मला वाटलं कुठेतरी ते माझ्या उस्तादपैकी आहेत. तुम्ही आणि मी एकाच पंथाचे झालो. अख्तर-उल-ईमानच्या इमेजेसना तोड नाही. आज उर्दूत खूपसे मान्यवर शायर आहेत; पण अख्तर-उल-ईमान त्यांच्यापेक्षा मोठे आहेत. काव्य ~ छंद ~ संगीत राम : तुमच्या कविता छंदोबद्ध नसतात. तुम्हांला छंदोबद्ध रचना कमी दर्जाची असते असे वाटते काय? गुलजार : छंदोबद्ध अन् मुक्त हे फॉर्म आहेत – काव्यात आहेत; पण मुक्त काव्यात एक स्पॉन्टेनिटी असते. छंदोबद्ध रचनेत एक बंदीश असते ज्यात कल्पना आपला प्रवाह घेत नाही. कल्पनेला आपोआप वाहू द्यावे, पाण्याप्रमाणे. त्याला मारून-मुटकुन आकार देण्याने त्यात कृत्रिमता येते. अन् काव्य म्हणजे फॉर्म नाही; ती एक कल्पना असते. मग त्यात कृत्रिमता कशाला हवी. राम : तुम्ही संगीतावर गीताचा साज चढवणे योग्य समजता? गुलजार : हा एक टू ट्रॅक ट्रैफिक आहे. मी कधी संगीताच्या लयीवर गीत लिहिले आहे, तर कधी गीतावर संगीताचे आवरण घातले – ते अशावेळीच की माझ्या लक्षात आले आहे की हा ताल, ही लय, ही गेयता माझया चित्रपटातील सिच्युएन्शनला एक्सप्रेस करत आहे; तेव्हाच मी त्यावर गीत लिहिले. तुम्ही जरा शांतपणे विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल, की जेव्हा तुम्ही लाइटर मूडमथे कविता करत असता त्यावेळी कुठेतरी हृदयात छंद वाजू लागतो. आवाज, शब्द, आणि लय : आशा भोसले, गुलजार, आर डी बर्मन (डावीकडून) (Photo via FB / NFAI) राम : सफल गीतासाठी संगीत व कवितेचे प्रमाण काय असावे? गुलजार : लिरीक आणि पोएट्री ही पद्य साहित्याची दोन स्पष्ट रूपं आहेत – हे दोन फॉर्म आहेत. माझ्या मते शैलेंद्रप्रमाणे लिरीक कुणालाच समजले नाही.. राम : (मधेच) नीरज आहे न? गुलजार : होय, ते पण एक कवी आहेत, साहीरही आहे; पण नीरजच्या गीतात कवितेचा रंग आहे. खरं सांगायचं तर नीरज व साहीर हे फार चांगले कवी आहेत; पण चित्रपटाचं स्वतःचं एक मीडियम असतं. ह्या दोघांनी ते स्वीकारलं नाही तर मीडियमने त्यांना स्वीकारलं. उलट मजरूह अन् शकीलनं त्या मिडियमला स्वीकारले. नीरज अन् साहीरला मीडियमनं फॉलो केलं! माझया बाबतीत मी ह्या मीडियममधेच आहे. तुम्हाला त्याची झलक माझ्या गीतात दिसेल; जसे “बडा बदमाश है ये दिल, न जाने किस पे आएगा” ही ओळ तुम्ही पुस्तकात लिहिणार नाही; पण चित्रपटात मात्र जे कॅरेक्टर हे गात॑ त्या कॅरेक्टरशी एकरूप झाल्यावर त्यातील यथार्थता समर्पक वाटल्याविना राहणार नाही. म्हणून म्हणतो फिल्मच्या मीडियमला समजावून घेणे फार महत्त्वाचे आहे. काव्यछटांतील न्यू-मिडीया पेंटिंग्ज राम : तुमच्या इतर कामातील व्यग्रतेमुछे तुम्ही तुमच्या कवितेला आवश्यक तेवढा वेळ देऊ शकत नाही असं तुम्हांला वाटत नाही? गुलजार : फॉर्म बदलले, मीडियम बदलले. असं नाही की मी कवितेवर अन्याय करीत आहे; पण मी कविता करीत असतो तर मी आजवर जे पेंटिंग अथवा चित्रपट बनवले ते तेवढे बनवू शकलो नसतो. मला काही मीडियम धरायचे आहेत; त्यापैकी काव्य हेही एक मीडियम आहे; जे कधी मला लहानही वाटतं, कधी मोठंही वाटतं. कलेचे काव्य हे एक मीडियम आहे. त्यात पेंटिंगही येतं. जसं तुम्ही पहा.. बिमल राय (Photo via Google Image Search) > बिमल राय > सांजेच्या धुक्यात वाहणारा अबोल नदीचा चेहरा > गव्हाळी धुक्यात जळत असलेले डोळ्यांचे दीप > एक लागोपाठ पेटलेला सिगारेटचा धूर > निजेत डबलेले दूरचे मंद आवाज > अनोळखी स्वप्नाच्या उडणाऱ्या सावल्यांच्या तळी > कोरलेल्या चेहऱ्याच्या विरघळत्या मेणाप्रमाणे > प्रत्येक नव्या स्वप्नाची चाल ऐकून बदलून जातात > असं वाटतं न झोपेल, न जागेल, न बोलेल कधी > सांजेच्या धुक्यात वाहणारा अबोल नदीचा चेहरा > > – गुलजार > > ( मराठी अनुवाद : डॉ. राम पंडित ) सलील चौधरी (Photo via Google Image Search) > सलील चौधरी > कापऱ्या तलावाच्या पाण्याची सपाटी > सूताच्या तागाशी बांधलेल्या पुराचा कोलाहल > हल्कीशी आघाताने झंकारून उठतात > तेज चाकूने रचलेल्या चेहस्याच्या रेषा > आतुर चेहऱ्यावर उडत असलेली डोळ्यांची अक्षरे > एका शोधात आहे, वाटतंय कोणत्याही क्षणी > जणु त्या पार्थिवतेस घाबरून ते उडून जातील > आपल्या स्वत:शीच गुंतलेली उडण्याची गती > स्वत:लाच घाबरून सुटून न जावो कुठेतरी > स्वतः आपल्याशीच हारलेली गतीचे उड्डाण > > – गुलजार > > ( मराठी अनुवाद : डॉ. राम पंडित ) बिमल राय, सलील चौधरी हे पोर्ट्रेट्स . मी काव्यात लिहिले हे तुम्हाला पेटिंग्जविना समजणार नाही. म्हणून मी पोर्ट्रेट्स कवितेत करू लागलो. हे सारे फॉर्मस् फाईन आर्टस्चे – एकमेकांशी संबंधित आहेत. वेळ एवढा तर नसतो की माणूस सारंच काही करू शकेल; पण ह्या फॉर्मच्या नात्यांना जाणून घ्यावे असे मनाला वाटते. कधी काव्यात आपण लँडस्केप करत असाल तर ऐज ए पेंटर तुम्हांला वाटेल की शायरीनं काव्यात लँडस्केप किंवा पोर्ट्रेट का लिहल्या जाऊ नये? हे पोट्रेटस जे मी लिहिले त्यात डोळ्यांचा किंवा ओठांचा उल्लेख नाही. ते एक इंप्रेशन आहे, पेर्सोनालिटीचे. राम : ज्यावेळी तुम्ही पेंटिंगकडे वळलात, त्यावेळी तुम्हांला तुमचा आशय, प्रतिभा सादर करण्यास कविता किंवा शब्द असमर्थ वाटले (होते) काय? गुलजार : नाही; असे वाटले की ज्यावेळी कविता करत होतो त्यावेळी काही ठिकाणी पेटिंग करावंसं वाटलं; उदाहरणार्थ – > रोज समुद्र किनाऱ्यावर उभे राहुन > बघितलंय > सांजेचं विरघळणारं लाल सोनेरी तेल > जे रोज गढूळ पाण्यात मिसळून जात॑ > रोज समुद्रकिनाऱ्यावर उभं असताना > विचार केलाय मी > त्या रंगीत आरक्ततेच्या विरघळलेल्या तेलाला > हातावर पुसून घ्यावे > अन् हळूच एकदा कुठेतरी > तुझ्या डाळिंबाच्या फुलासारख्या गालावर > अवचित फासावे > > – गुलजार > > ( मराठी अनुवाद : डॉ. राम पंडित ) ही पेंटिंगची जाणीव आहे. रंगांशी खेळावेसे वाटते. तर आपोआप त्या फॉर्मची ओढ लागली अन् कधी पेंटिंग करतांना कधी शेर म्हणावासा वाटतो. हे जे परस्परांतील नातं आहे, ते फारच सुरेख आहे. माझ्या पुस्तकात मी खाजगी प्रतिक्रियेच्या समवेतच चालत राहिलो. राम : तसं नाही, वाचकांच्या हातांत तुमची रचना आल्यानंतर, ते त्या रचनेशी समरस झाल्यानंतर तुमची व्यक्तिगत प्रतिक्रिया तुमची स्वतःची न राहता नकळतच त्यांची, म्हणजेच, सामाजिक होते असं वाटत नाही का? गुलजार : होय, तू म्हणतोस ते खरे आहे. ते पीरिएडवर डिपेंड करतं. आता बघ, ही कविता, “मुझे एस. पी. राय ने दफ्तरसे बाहर निकाल दिया, क्योंकि मुझे संध्या से मिलना था!” आता ही दोन नावं आहेत; पण वाचणाऱ्याला वाटतं की ती दोन कॅरेक्टर आहेत. फक्त त्या वाचकाला हे माहिती नसतं की संध्या गुलजारची बायको आहे की प्रेयसी; त्याच्या दृष्टीने ते फक्त कॅरेक्टर आहेत. एस. पी. राय कदाचित सुरेंद्रपाल रॉय म्हटल्याने तो वाटणार नाही; पण एस. पी. रॉय म्हटल्याने तो बॉस वाटतो. ही कविता माझया सामाजिक जीवनाचं दर्शन घडवते. असे क्षण मी माइया खाजगी जीवनातून वेचलेलं अन् रेखाटलं. खरं तर आपल्याला लिहिण्यासाठी बाहेर शोधावयास जायची आवश्यकताच नाही. आपल्या स्वतःमधेच एवढं काही असतं की ते लिहिण्यास हे जीवन, हा जन्म, कमी आहे पंडितजी ! कविमनातील विचार-भोवरे (आशय चर्चा) राम : आता तुमच्या दोन कवितांबाबत विचारतो, “कवी जो जन्मापासून माइयासोबत आहे”, आणि दुसरी “तो कवी जो मौन राहात असे..” ह्या दोन कवितांत उल्लेखलेला कवी कोण? गुलजार : हा कवी मीच आहे. ते सारे क्षण माझे आहेत. असे काही क्षण जीवनात येतात. हे क्षण फकिराप्रमाणे येतात, जसं त्या कवितेत म्हटले आहे,“चाँद की ठोडी चूमकर वहांसे गिर के खुदखुशी कर ली”. इथे, कुठे जीवनापाशी जाऊ इच्छितो, कुठे त्यापासून दूर जावेसे वाटते. हे दोन्ही एकाच कॅरेक्टरचे विविध अंगं आहेत. राम : आता तुमच्या तीन कवितांची निर्मिती व पार्श्वभूमी मला सांगा : पहिली कविता आहे , ती अशी – > बंद काचेच्या पलीकडे बघच > झरोक्याकडे > हिरव्या वृक्षांच्या गर्द डहाळ्यांवर फुलांवर > तिथे कसं मौनपणे पाणी निरंतर पडत॑ > किती गोंगाट आहे > हे लोक आहेत > परंतु बुद्धीच्या मागो आणखीही > पृष्ठभागावर कुठेतरी > जणु चुपचाप ओघब्ठत आहे > तुझे चिंतन > > – गुलजार > > ( मराठी अनुवाद : डॉ. राम पंडित ) गुलजार : पहिली कविता – मी मोहन स्टुडिओमधील कार्यालयात काम करीत आहे. सारे आपआपल्या कार्यात मग्न आहेत. कोणी अकाऊंटस पहात आहे. कोणी स्क्रिप्ट वाचत आहे. कोणी डिस्कशन, कोणी गोष्टी करत आहे. बाहेर खिडकीपलीकडे गुलमोहराच्या झाडावर पाऊस पडत आहे, ऐटमॉस्फिअर मोहन स्टुडिओमधलं आहे अन् मी त्याचवेळी माझ॑ कामही करीत आहे. शुटिंगची लिस्ट तयार करत आहे. स्क्रिप्टही वाचत आहे; शेरही आठवत आहे, अन् त्याचवेळी बुद्धीच्या पलीकडे कुठेतरी आपल्या प्रेयसीचा विचारही पिंगा घालतोय. अगदी तसाच, जसा बाहेर पाऊस पडत आहे अन् आत सारेजण काम करीत आहेत. दुसरी कविता – > रंगबिरंगी सुरेख, कागदांना > चांगल्यातऱ्हेने कातरून वेल > देवतांच्या मूर्ती जमवून > रोज धुपाचा धूर देऊन > घराला देऊळ बनविले होते. > पण जेव्हापासून फुलदाणीत > तू उगवलेली कोमेजली फुले ठेवलीस > जेव्हापासून सम्मिलित केलंय श्वासांत > जीवनाच्या सुंदर अपराधांना > देवळांस घर बनविले आम्ही > > – गुलजार > > ( मराठी अनुवाद : डॉ. राम पंडित ) गुलजार : कुठेतरी मंदिर अन् घरात फरक असतो तसाच मॉरल अन् धर्मातला फरक आहे. प्रियेचे मी चुंबन घेतले; आता हे सांगणं ठीक नाही; पण सांगतो की हे कुठेतरी ठीक आहेही आणि नाहीही. प्रेमात प्रियेला नुसतं देवी म्हणून मंदिरात ठेवावंसं वाटत नाही तर कधीकधी तिच्या देहाला स्पर्श करावासा वाटतो, तिचं चुंबन घ्यावंस वाटतं किंवा अधिकही काही वाटत॑. संकोचाने मी थोडाबहूत दबून होतो. अन् ज्या दिवशी मी तिच्या ओठांना चुंबिले अन् देहाला स्पर्श केला त्या दिवशी जाणवलं की ते मंदिर नाही घर आहे हा, इमेजिनेशन ते मॉरलपर्य॑तचा प्रवास ह्यात आहे. तिसरी कविता – > अंह-अंह, > राहू द्या मिटवू नका त्यांना > ह्या रेषांना असंच राहू द्या > इवल्या इवल्या गुलाबी हातांनी > माइया निरागस चिमुकल्या मुलाने > आडव्यातिडव्या रेषा ओढल्या आहेत > चेहरा तयार झाला नाही > तर काय झाल॑ > माइया मुलाचे हात आहेत ह्यात – > माझी ओळख आहे रेषांमधे.. > > – गुलजार > > ( मराठी अनुवाद : डॉ. राम पंडित ) गुलजार : तुम्ही बघितलं असेल जेव्हा एकाद्याची पत्नी त्याला लिहिते तेंव्हा त्यात कधीकधी आपल्या लहान मुलाच्या हातात लेखणी देऊन त्याला पण आपल्या बापाला पत्र लिहावयास लावते. खरं तर त्यात विचार तिचेच असतात, अक्षरही त्या मुलाचं नसतं; पण कुठेतरी मला त्यात एक मेसेज आढळला. मला हे माझ्या स्वतःच्या जीवनात आलेल्या अनुभवातून मी ते चितारलं. ह्या शब्दांत की कुठेतरी ह्या वेड्यावाकड्या रेषांत माझी ओळख आहे. रुबाईयां, कता’अ, मर्सिया राम : तुम्ही रुबाईयां, कता’अ, मर्सिया आदि काव्यप्रकार हाताळले की नाही. गुलजार : लिहिले; गजल, रुबाइयां, कता’अ – त्रिवेण्या – हे सारे काव्य प्रकार लिहिले; पण पुस्तकात प्रकाशित केले नाहीत. (विनोदाने) रियाज तर सगळ्या प्ररकारचा केला भैय्या.. राम : तुम्ही एका कवितेत “दिल ढूंढाता है फिर वही फुर्सत के रात दिन” हा गालिबचा शेर वापरलाय प्रथम ओळ म्हणून.. तसेच फैजच्या “तेरी आँखों के सिवा दुनिया में रक्खा कया है”; किंवा माजाजच्या “छलके तेरी आँखोसे शराब और ज्यादा” ह्या ओळी मजरूह, हसरत आदिंनी वापरल्या आहेत. तुम्हांला मतला (प्रथम ओळी) मिळत नव्हता की तुम्ही त्या ओळींना आपल्या ढंगाने पूर्ण करू इच्छित होता? गुलजार : फारच छान प्रश्न विचारलास. हे मी चित्रपटातच नाही, तर तू बघत असशील, पुस्तकात (पण) मी मोमीनच्या एका शेरवरही असंच केलंय, ही कैफियत ह्या व्यक्तीनी किती सुरेख ढंगाने मांडली आहे. “दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन” बघ किती मोठी गोष्ट गालिबने ह्या लहानशा ओळीत सांगितली आहे. दिल्लीची थंडीही अंगणात पहुडली आहे, तोंडावर ऊन्हें पडली आहेत, अन डोळ्यांवर काहीतरी ठेवलंय – हीच तर कैफियत होती. ज्याकरिता गालिबने ह्या ओळी लिहिल्या अन् कितीदा तरी असंही वाटलं एकटे रात्री अंथरूण पांढऱ्या छतावर टाकून पहुडलोय. गर्मीचे दिवस आहेत, हळुवार वारा वाहतोय, अन् काम काहीच नाही! फुर्सतच फुर्सत आहे. मग अंथरुणावर पडून आपल्या प्रियतमेचा विचार करीत बसलो. ह्यात मी गालिबची ही ओळ कोणकोणत्या क्षणी कशीकशी अनुभवली हे वर्णन केलंय. असंच मीर मोमीन आदिंच्या ओळींवरही मी लिहिलंय. हा एक मार्ग मी माइया अनुभव अन् जाणिवांना सादर करण्यासाठी अवलंबिला व नव्या धर्तीचा म्हणाल तर काव्यप्रकारही उर्दूत आला. कवित्व आणि दुःख राम : फैज अहमद फैज ह्या जगविख्यात उर्दू कवीचे म्हणणे आहे की चांगल्या सकस काव्यनिर्मितीसाठी दुःख गाठी असणे आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटते? गुलजार : अं अं.. (थोडा वेळ विचार करून) नाही.. मला.. तरी असं वाटत नाही. असं आवश्यक नाही की त्याला दुःख हेच नाव द्यावं, ती एक कैफियत आहे. सुख आणि दुःख हे जीवनाचे सरळ दोन शेड्स आहेत हे तर मान्य आहे नं तुला? जर तुम्ही कोणत्याही अवस्थेत असलात अन् त्या अवस्थेची जाणीव तुम्हाला असेल तर ती अवस्था सुखाची, दुःखाची, आनंदाची किंवा कशीही असो त्यात तुम्ही शेर म्हणाल, शेर लिहाल – तक्रार, विनवणी, विरहवियोग, असे कित्येक विषय आहेत ज्यावर उर्दू साहित्यात चांगले शेर लिहिण्यात आले आहेत; पण मी एवढं निश्चितच म्हणेन की चांगल्या कवितेसाठी तीव्र जाणीव व तर्कशुद्ध कल्पनाशक्तीची नितांत आवश्यकता आहे. कवितेतील काल्पनिक पात्रें राम : अख्तर शिरानी, अख्तर-उल-ईमान, इत्यादि उर्दू कवींच्या काव्यात सलमा, हबीबा, रावी असे नाव वापरल्याने आपल्याला अढळते. तसेच तुम्ही पण सोना, बीबा ही नावं वारंवार वापरली आहेत. हे काव्यदृष्टया योग्य आहे काय? ते तुम्हाला आवश्यक वाटले काय? गुलजार : अयोग्य पण नाही. अख्तर शिरानीने सर्वप्रथम ही प्रथा वापरात आणली; पण त्यात अयोग्य अस काय आहे? उलट तर फार चांगलं आहे असं नाही वाटत तुला ? तशी काही आवश्यकता नाही की ते फक्त प्रेयसीचंच नाव असावं. ते कॅरेक्टरचे नाव असू शकतं. माझ्या कवितेत तू बघ, नेहमीच मी नावाच्या एका कॅरेक्टर वारंवार उल्लेख केलाय, जशी टागोरांची कविता आहे. ‘वनोलता सायन’ एका काळ्याशा मुलीला भेटून आले होते. तिच्यावर कविता आहे, त्यात तिचं नाव आहे. फार सुरेख गोष्ट आहे. रीडरने त्यात पर्सनल काहीही शोधण्याची आवश्यकता नाही. ते तुमच्याही प्रेयसीच॑ नाव असू शकतं; ते जनरलाइज करायला हवं; पण मला वाटतं ते नाव वापरणं फार गोड वाटत॑. राम : मलाही हे आवडलं; पण मला वाटत॑, ते प्रथेपासून जरासं अलग आहे. गुलजार : होय. तसं जर प्रथा अन् परंपरेपासून अलग असेल तर अधिकच चांगले आहे. गजल : कवितेची पहिली पायरी? राम : अहमद नदीम कासमी हा कवी म्हणतो, चांगला गजल लिहिणाराच चांगल्या कविता (मुक्त किंवा छंदोबद्ध) करू शकतो. तुम्हाला काय वाटतं? गुलजार : रियाज करण्यासाठी, हे आम्ही आमच्या गुरूपासून शिकलो, की गजलच प्रारंभ आहे अन् गजलच अंत आहे. गजल ही कसोटी आहे ह्रीदमची. इन एनी म्युझिक, बेस इज रिमेन तबला अँड हाइट इज रिमेन तबला; पण ही सांगण्याची गोष्ट आहे; कारण एका शेर मध्ये (दोन ओळींत) खूप काही सांगणं हे गजलचं महत्त्व आहे अन् नेमकी हीच गोष्ट कठीण आहे. म्हणून गजल ही एक परीक्षा आहे. गजलवरच कवीचा खरा कस लागतो. राम : तुम्ही गजल लिहिल्या अथवा नाही? गुलजार : लिहिल्या ना.. खूप लिहिल्या. रियाज म्हणून जे जे करायला हवं ते ते केलं; पण पुस्तकात मात्र नज्म हाच फॉर्म इनक्लूड केलाय. राम : गालिब व फैज यांना विनाकारण शेर लिहणे अमान्य आहे. पण आजचे श्रेष्ठ गजलकार फिराक तर त्यांच्या शेरमुळेच प्रसिद्ध आहेत. तुम्हांला काय वाटतं? गुलजार : शेर कधीच विनाकारण नाही. शेर म्हणजे एक मूड असतो. तुम्ही मित्रांमध्ये बसले आहात अन् एखादा विनोदी शेर म्हणालात तर तो आनंद तर देऊन जातो, पण ते मूडवर डिपेंड करतं – जीवनाचे विविध रंग असतात यार, जीवनात एक मूड नाही, अनेक मूडस् असतात. तुम्ही आनंदातही शेर म्हणू शकता; एवढंच काय स्वतः गालिबचे कितीतरी हास्यविनोद प्रसिद्ध आहेत. मला वाटतं (विनोदाने) बरट्रांड रसेल कधी तरी हसला असेलच, नाही असं नाहीच. तो जरी मोठा फिलासफर होता तरी नेहमीच उदास बसला असेल हे मला मान्य नाही. जीवनाच्या ह्या विविध क्षणांना आपण जेवढे श्वास मिळाले आहेत तेवढया अवधीत जाणून घेतलं पाहिजे. अन् तो अनुभव काव्यात चितारला पाहिजे; मग तो सुख-दुःखाचा किवा कसाही असो. काही विचार आणि ख्यालों का टकराना.. राम : खूपशा कवींच्या कल्पना (उर्दूत) मिळत्या जुळत्या आढकतात. हा योगायोग म्हणावा काय ? गुलजार : होय, असू शकतं. खास करून उर्दूत ही शक्यता जास्त आहे; कारण हे साहित्य पद्यामध्येच जास्त विकसित होत गेलय अन् छंदात्मक काव्य लिहिताना यमक जुळवण्यासाठी जे शब्द योजतो, त्यामुळे हे असं घडण्याची शक्यता जास्त आहे. राम : कलेकरता कला की जीवनाकरता कला ह्यातील कोणती बाजू तुम्हांला मान्य आहे? गुलजार : माझ्याकरता प्रत्येक कला जीवन आहे. जी जीवनापासून विलग आहे, ती कलाच नव्हे! राम : प्रचंड प्रमाणावर लिखाण करणाऱ्या लेखकांच्या लिखाणावर क्वॉलिटीच्या दृष्टया काय परिणाम होतो अथवा नाही? उदाहरणार्थ कृष्णचंद्र, शौकत थानवी, इत्यादी लेखकवर्ग.. गुलजार : होय, ‘कॉन्सन्ट्रेशन ऑन इमेजस’ कमी होत जातं. बस, विचार न करता लिहीतच जाणे ह्याला लिखाण म्हणत नाहीत; कारण पुढेपुढे तो जर लिखाणाला प्रोफेशन समजत असेल तर ते असेच घडत जाईल. राम : रूबाईयांत हे उर्दू काव्यांग जेवढे लोकप्रिय झाले तेवढे ‘कत’आ’ हे काव्यांग का झाले नाही? गुलजार : होय, कारण रुबाईयांत हा काव्यप्रकार स्वयंपूर्ण आहे व ‘कत’आ’ हा काव्यप्रकार गजलमधे बहुतांशी आढळतोच. रुबाइयातचे स्वतंत्र अस्तित्व आहे; पण तरी हे फॉर्म हिंदीच्या दोह्यांएवढा पॉप्युलर झालेला मात्र नाही. नरेशकुमार ‘शाद’नी ह्या काव्यप्रकारांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. > [ एवढयात बोस्की तिथे आली अन् तिने थोडाबहूत आमच्या बोलण्यात व्यत्यय आणला; पण > गुलजारनं तिला चॉकलेटसाठी पैसे देऊन ड्राइव्हरबरोबर मार्केटला पाठवले. बोस्की > दिसायला बिल्कुल राखीसारखीच आहे. तेच बोलके डोळे, तिच केसांची ठेवण. पण बोलणं > मात्र लहान वयातच मोठयांसारखं. ती ऑफिसमधून आईशी फोनवरून बोलण्यासाठी आली होती. > राखी त्यावेळी दिल्लीला शुटिंगसाठी गेली होती. गुलजारने डायरेक्ट डायल करून > ओबेराय इंटरकॉन्टिनेंटलशी संपर्क प्रस्थापित केला; पण कळलं की ती > मार्केटिंग-शॉपिंगसाठी बाहेर गेली आहे. त्या सर्व गोष्टीनंतर चहा घेत आम्ही > पुन्हा इंटरव्ह्यूला प्रारंभ केला. ] राम : अली सरदार जाफरी, सज्जाद जहीर हे उर्दू टीकाकार चांगले टीकाकार असले तरी त्यांची टीकापद्धती थोडीबहूत काव्यात्मक असते. हा उर्दू साहित्याच या रसिक प्रकृतीचा परिणाम आहे काय? गुलजार : हे दोघेही कवी व लेखकही आहेत त्यामुळे नकळत भाषेची परस्परात सरमिसळ होणे स्वाभाविकच आहे; पण एखाद्या टीकाकाराला कविता करताना बघणे मला जास्त मजेशीर वाटेल. राम : कोणती कविता दीर्घजीवी आहे – मुक्त की छंदात्मक? गुलजार : तसं बघितलं तर चांगली कविताच जास्त दिवस जगेल; मग ती कोणत्याही फॉर्ममध्ये येवो; पण आजचे युग हे मुक्त काव्याचे युग आहे. मला वाटतं ह्या मुक्तकाव्याचे जीवन फार दीर्घ आहे. तसं मात्र म्हणता येणार नाही की छंदात्मक काव्य जगूच शकणार नाही. उलट गालिबचे काव्य छंदात्मक आहे अन् अजूनही उत्कृष्ट आहे. उर्दू : गांधीजींची ‘हिन्दुस्थानी’ व फ़िराकचे संस्कृत विचार राम : गांधीजींच्या मतानुसार, ‘हिंदी + उर्दू = हिन्दुस्थानी’ – ह्या भाषेचा खरा उपयोग बोलचाली होतो; पण लिहिण्यात नाही. फिराक गोरखपुरी म्हणतात – उर्दूत संस्कृतचे वीस-पंचवीस हजार शब्द मिळवले तर उर्दू एक श्रेष्ठ भाषा बनू शकेल. हे खरं आहे काय? गुलजार : मला हे एकदम मान्य आहे; पण हिंदुस्थानी भाषा जिला आपण म्हणतो, ती फक्त हिंदी चित्रपटाचीच (तर) भाषा आहे. ती भाषा आज बोलण्यात वापरली जाते. जर लिहिण्यात. ही वापरली गेली तर मला वाटतं त्यातून एक सुरेख हिंदुस्थानी भाषेचा जन्म होईल. ती एक अत्यंत गोड भाषा होईल अन् समजण्यास सरल व सुबोधही असेल. त्यात संस्कृतचे शब्द मिसळले, तर शब्दसंग्रहही वाढेल; व भाषा उमलण्यास मदत होईल. राम : पण; त्यामुळे उर्दूची ओरिजनेलिटी जाईल नं? गुलजार : भाषा ओरिजनल कोणती असते. ती बहरत असते, उमलत असते, वाढत असते; पण वृद्ध होत नाही! ती एका वृक्षासारखी वाढते. एखाद्या झाडाला एक फांदी फुटली तर तुम्ही ही फांदी ह्या मूळ झाडाची नाही असं म्हणाल काय? तसंच भाषेत इतर भाषांच्या शब्दांच्या येण्याने बहरण्यास मदत होते. कवीच्या स्थयी धारणा, कवितेतील कालानुगामी बदल राम : कवीने एखाद्या विचारप्रणालीशी बांधलेले राहवे की मुक्त विचाराचे जीवन जगावे? गुलजार : कवीचा एक निश्चित असा ऐटीट्युड ऑफ लाइफ असावा. मग तो कवीच असावा असे नाही, तर कोणीही – ज्याला काहीही क्रिएटिव्ह वर्क करायचं आहे, त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन निश्चित असावा. राम : असे म्हणतात की कविता बदलत जाते. जर ती हृदयातून उभरणारी असेल, तर काळानुसार का बदलते? गुलजार : नाही. समाज बदलत जातो, काळाच्या वह्याल्यूज पण बदलत जातात, व साहित्याबरोबर विचारधारणाही बदलू लागतात. प्रत्येक युगाबरोबर राजकीय, आर्थिक व सामाजिक परिवर्तनाबरोबर विचारधारा बदलते व सहाजिकच विचारधारा व जीवनातील मुल्यांच्या बदलाने साहित्यातही परिवर्तन येते, व कविताही बदलत जाते. चित्रपट सृष्टीतील विविध ‘भूमिका’ राम : असं ऐकलंय की तुम्ही चित्रपटात काम करीत आहात. तुम्हाला तुमची प्रतिभा सादर करण्यास काव्य, दिग्दर्शन, संवाद लेखन इत्यादी मीडियम कमी भासले काय? गुलजार : नाही, माझं चित्रपटात काम करणं हा एक योगायोग आहे. तो कोइन्सीडन्सही म्हणण्यापेक्षा ऍक्सिडेंटच आहे. बासु भट्टाचार्यची अन् माझी – आम्ही दोघेंही चित्रपटात येण्यापूर्वीपासूनची – दोस्ती. तो काव्य बंगालीत अनुवादित करत असे, अन् मी बंगाली वाङ्मय उर्दूत अनुवादित करत असे. नंतर आम्ही दोघांनी बिमल रॉय प्रॉडक्शन मधेही एकत्र काम केलय. तो सुखांत भट्टाचार्य ह्वा बंगाली कवीच्या जीवनावर चित्रपट काढतोय; त्यात माझ्या काही कविता आहेत. आता, माझ्या कविता आहेत म्हणून त्याने मलाच चित्रपटात वाचावयास सांगितल्या, एवढंच. आता तो मित्र असल्यामुळे थोडंबहुत बंधन येतंच! गुलजार यांच्या ‘किनारा’ (१९७७) चित्रपटाचे पोस्टर (Photo via Google Image Search) राम : एक कवी, लेखक; अन् एक निर्माता – म्हणजे एक बिझनेसमन – ह्या दोन गोष्टींचा मेळ कसा घालता? गुलजार : मी निर्माता मुळीच नाही! हा गैरसमज आहे. हा चित्रपट ‘किनारा’, ह्यात मी माझे स्नेही प्राणलाल मेहता ह्यांच्या बरोबर पार्टनरशिप केली आहे. ती फक्त ह्याचकरता, की मी त्यांच्याकडून एकही पैसा घेतला नाही, व ‘जो काही प्रॉफिट होईल तो वाटून घेऊ’ – एवढ्या एका बोलीवर. माझ्यामधल्या कलाकाराला हा धंद्याचा उपदव्याप जमणे सर्वथा अश्यक्य आहे. त्यामुळे, मी कधीच चित्रपट निर्मितीच्या भानगडीत पडलो नाही. मेघना हे माझ्या मुलीचं नाव प्राणलाल मेहतांनी प्रॉडक्शनला दिलंय, ते प्रेमाखातर, एवढेच. साऱ्या बाबी तेच सांभाळतात. मी फक्त लिखाण, दिग्दर्शन, आदि सांभाळतो. गद्य लेखनाविषयी राम : तुम्ही कधी नाटक, एकांकिका लिहिल्या ? गुलजार : होय, प्रारंभी रेडिओसाठी अन् कॉलेजसाठी लिहिले; पण नंतर फारसा अवधी मिळाला नाही. राम : तुम्हाला कविता, संवादलेखन, कथा, कादंबरी ह्यांपेकी कोणते लिखाण जास्त आवडते? गुलजार : अर्थात कविता – कारण मी मूळतःच कवी असल्यामुळे कोणताही साहित्यप्रकार लिहिण्यापूर्वी मला कविताच जास्त सुचते! सांगता गुलजार (Photo via Getty Images) > [ ह्यानंतर मी गुलजारला इतर सर्वसामान्य विषयांवर प्रश्न विचारले. ह्यात > प्रामुख्याने राजकारणाचा समावेश होता; पण हा इंटरव्ह्यू आणीबाणीच्या काळात घेतला > असल्यामुळे आज त्या संवादाचे फारसे महत्त्व नाही; पण एवढं मात्र खरे की त्याही > काळात गुलजारची मते कलेशी एकनिष्ठ होती. सांप्रत राजकारणाशी समन्वय करावयास ते > फारसे तयार नव्हते.] आभार प्रदर्शन ह्या दीर्घ मुलाखतीसाठी मला श्री. भूषण बनमाली, चंद्रशेखर के. गंगाधर, मायकेल आणि पांडे ह्या मेघना मुव्हीजच्या लोकांची फार मदत झाली. श्री. बनमाली स्वतः हिन्दीचे कवी व लेखक आहेत. (‘किनारा’ ह्या चित्रपटाची कथा त्यांचीच आहे.) गुलजार ह्वा प्रतिभावंत कलाकाराला मी जाणून घेण्यासाठी जे प्रश्न विचारले ते अर्थात त्याच्या साहित्यावर व उर्दू भाषेतील साहित्यिकावर असणे सहाजिकच आहे; पण यथाशक्य मराठी वाचकांना उर्दू साहित्याबद्दल जी माहिती आहे ती लक्षात घेऊनच मी हे प्रश्न विचारले. ह्या संवादामुकळे गुलजारची वांङ्मयीन दृष्टी समजण्यास मदत होईल एवढीच अपेक्षा आहे. संगणकी टंकनात प्रमुख योगदान : श्री. जनार्दन केशव म्हात्रे, मुंबई प्रस्तुत लेखाचे डिजिटल उप-संपादन : परेश राम पंडित (©२०२२ । सर्व हक्क राखीव । पूर्व आणि लेखी परवानगीशिवाय पुनरुत्पादनास कोणत्याही स्वरूपात किंवा पद्धतीने परवानगी नाही) * Tags bollywood, drrampandit, gulzar, interview, literature, lyricist, marathi, poetry, rampandit, urdu * Facebook * Email © 2023 Dr Ram Pandit | Padmanandan Privacy Policy Powered by WordPress To the top ↑ Up ↑